Daily Mahasatta

Daily Mahasatta

रेणावीत वाहनांचे पंक्चर काढणाऱ्या इमताज भाभी झाल्या सरपंच

विटा: रेणावीच्या नुतन सरपंच इमताज भाभी यांचा सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील व अन्य.

: खानापूर तालुक्यातील तेरा गावच्या सरपंच निवडी संपन्न.

विटा ( मनोज देवकर)
आरक्षणामुळे तळागाळातील लोकांना सरपंच होण्याची संधी मिळत आहे. खानापूर तालुक्यातील तेरा गावच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या गावातील सरपंच उपसरपंच निवडी आज पार पडला. तेरा पैकी सात ठिकाणी महिला सरपंच झाल्या आहेत. खंबाळे आणि मेंगाणवाडी येथील सरपंचपद रिक्त राहिले आहे.

माहुली गावच्या सरपंचपदी प्रणव प्रकाश पाटील यांची तर उपसरपंचपदी वंदना राजकुमार माने यांनी निवड झाली आहे. रेणावी गावच्या सरपंचपदी इमताज शिकलगार यांची तर उपसरपंच पदी कुमार पवार यांची निवड झाली. नागेवाडीत शिवसेना तालुकाप्रमुख सतिश निकम सरपंच झाले आहेत तर उपसरपंच पदी विजय कचरे यांची निवड झाली आहे. मंगरूळमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य रामरावदादा पाटील यांचे नातू अभिजीत पाटील उपसरपंच झाले. तर सरपंचपदी अंजली कुंभार यांची निवड करण्यात आली आहे.

तांदळगांव आणि भडकेवाडी या बिनविरोध ग्रामपंचायती झाल्या होत्या. तांदळगाव मध्ये सरपंचपदी पुष्पा शिरतोडे तर उपसरपंच पदी वैशाली चव्हाण यांची निवड झाली. भडकेवाडी येथे संजय शेंडगे सरपंच तर संगीता जाधव यांची उपसरपंच पदी निवड झाली. पारे गावच्या सरपंचपदी मालन साळुंखे , तर उपसरपंच पदी सुबराव पाटील यांची निवड झाली. देवीखिंडी च्या सरपंच पदी रुक्मिणी निकम तर उपसरपंच पदी लक्ष्मी केंगार यांची निवड झाली.

भिकवडी बु. च्या सरपंच पदी सुनंदा शेळके तर उपसरपंच पदी धनाजी तामखडे यांची निवड झाली. शेंडगे वाडी च्या सरपंचपदी चंद्रभागा कदम आणि उपसरपंच पदी जोतीराम माने यांची निवड झाली. पोसेवाडी च्या सरपंच पदी अंकुश ठोंबरे आणि उपसरपंच पदी सागर जाधव यांची निवड झाली.

खंबाळे ( भा.) आणि मेंगाणवाडी येथील सरपंचपद रिक्त राहिले आहे. मेंगाणवाडीच्या उपसरपंचपदी कुबेर जाधव यांची निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वात पाच वर्षे कारभार केला जाईल. नागरिकांचा मागास प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंचपद रिक्त राहणार आहे. खंबाळे (भा) येथील सरपंचपद सर्वसाधारण महिला आरक्षित आहे. कुणीही अर्ज न भरल्याने पद रिक्त राहिले असून उपसरपंच पदी अमोल सुर्वे यांची निवड झाली आहे.

Post a Comment

0 Comments