Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरात शेतात पाणी गेल्याच्या कारणावरून एकाचा खून

इस्लामपूर ( प्रतिनिधी )
इस्लामपूर-खेड रस्त्यावर शेतात पाणी पाजण्याच्या कारणावरून अशोक आनंदराव पाटील,( वय-४५) यांचा लोखंडी गजाने पाठीमागून डोक्यात वार करून निर्घृण खून झाला. ही घटना  सकाळी ११ वा. च्या सुमारास घडली, हल्लेखोर हा खून करून पसार झाला आहे.

मयत अशोक पाटील हे पाटकऱ्याचे काम करत होते. आज त्यांचा निघृणपणे खून करण्यात आला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, हल्लेखोर हा जवळील भावकितीलच असल्याचे समजते. इस्लामपूर पोलीसांनी आरोपीच्या शोधात पथके रवाना केली आहेत.

Post a Comment

0 Comments