Daily Mahasatta

Daily Mahasatta

तासगावात १८ ते २३ फेब्रुवारीला स्वाभिमानीचे शिवार कृषी प्रदर्शन

जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची माहिती
तासगाव (प्रतिनिधी)
स्वाभिमानी शेतकरी संघटना व क्रांतीसिंह नाना पाटील  बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने   १८ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत तासगावात शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. तासगाव सांगली रोडनजीक दत्त मंदिराजवळ  हे प्रदर्शन होणार आहे.  माजी खास. राजू शेट्टी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. तासगावसारख्या दुष्काळी तालुक्यात शिवार कृषी प्रदर्शनाचे हे यशस्वी ७ वे वर्ष आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना खराडे म्हणाले, गेल्या ६ वर्षांच्या यशस्वी आयोजनानंतर शेतकऱ्यांची हे प्रदर्शन यावर्षीही घ्यावे, अशी मागणी होती. फोंडया माळावर शेती फुलवण्याची किमया येथील शेतकाऱ्यांमध्ये आहे. मात्र जगाच्या बाजारपेठेत काय चालल आहे. आमच्या शेतकऱ्यासही समजल पाहिजे. काय पिकवल पाहिजे ? जगाला कशाची गरज आहे ? याची सर्व माहिती शेतकऱ्यांना शिवार मधे पाहायला मिळणार  आहे.

तासगाव ची द्राक्ष व बेदाणा जगाच्या बाजारपेठेत दिसतात. मात्र त्यास अधिक माहिती तंत्रज्ञानाची जोड़ मिळावी यासाठीच शिवार चे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनात देशी व विदेशी कुत्र्यांचा डॉग शो १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता , पशू  प्रदर्शन २० फेब्रुवारी सकाळी १० वाजता, द्राक्ष, बेदाणा प्रदर्शन, तांदूळ महोत्सव, शेतकरी बाजार , कडधान्य महोत्सव याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात लहान मुलांना खेळण्यासाठी मॅनेजमेंट पार्क ची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रदर्शनासाठी डोम स्ट्रक्चर असून वनिता एग्रो, फिनॉलेक्स पाईप, हुंडाई , क्याप्टन , महेन्द्रा, यांसह नामवंत कंपन्यांची कृषी अवजारे , बियाणे, खते, ट्रॅकटर, सह २०० हुन अधिक स्टॉल आहेत. तरी या प्रदर्शनाचा सर्व शेतकरी बंधुनी लाभ घ्यावा असे आवाहन खराडे यांनी केले आहे.
----------------------------------

शिवार प्रदर्शनात
शेतकरी बाजार :

राज्यात कोणत्याही कृषी प्रदर्शनात शेतकार्यांसाठी मोफत सुविधा असत नाही. मात्र शिवार कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या विक्रीसाठीच्या मालासाठी मोफत सुविधा देण्यात आली आहे. भाजीपाला, फळे, धान्य, इत्यादीच्या विक्रीसाठी व्यवस्था  केली आहे. ग्राहक व शेतकरी यांचा थेट संबंध व्हावा, यासाठी हा बाजार भरवण्यात आला आहे. याचा लाभ द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.


 

Post a Comment

0 Comments