Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत संजय गांधी निराधार योजनेची 85 प्रकरण मंजूर : ज्योती अदाटे


सांगली (प्रतिनिधी)
संजय गांधी निराधार योजनेची समिती स्थापन झाल्यापासुनची तिसरी मिटींग ज्योती आदाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या मिटींग मधे 85 प्रकरणे मंजुर करण्यात आली तसेच 24 बोगस प्रकरणे निकाली काढण्यात आली. पैकी 2 प्रकरणे फेरचौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती अध्यक्षा ज्योती अदाटे यांनी दिली आहे.

अदाटे म्हणाल्या, आजअखेर संजय गांधी निराधार योजनेची 200 प्रकरणे मंजुर झाली. पात्र लाभार्थ्यांपैकी कोणावरच अन्याय होता कामा नये असा प्रयत्न सुरू आहे. तसेच बोगसगिरी देखील खपवून घेतली जाणार नाही. या समितीत सर्व प्रकरणे काटेकोरपणे तपासली जात आहेत, अशी माहिती ज्योती अदाटे यांनी दिली आहे.

यावेळी आप्पासाहेब ढोले, बिपिन कदम, संतोष भोसले, आशा पाटील इत्यादी सदस्य आणि तहसीलदार के. व्ही. घाडगे, तलाठी एम. आय. मुलाणी व एस. आय. खतिब लिपिक सचिन गुरव आणि प्रियांका तुपलोंडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments