Daily Mahasatta

Daily Mahasatta

उमदी ते कोत्याणबोंबलाद रस्त्यासाठी 62 कोटीचा निधी मंजूर : संजयकुमार तेली

जत (सोमनिंग कोळी)
उमदी ते विजापूर पर्यंत रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गास मंजूर मिळाली असुन उमदी ते कोत्याणबोंबलाद पर्यंत च्या ३१ किलोमीटर रस्त्यासाठी ६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी विजापूर चे खासदार रमेश जिगजणी व जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी वारंवार पाठपुरावा करून उर्वरित उमदी ते कोत्याबोंबलाद हे रस्ताचे काम मंजूर करून घेतले असल्याची माहिती उमदी जिल्हा परिषद मतदार संघाचे युवा नेते संजयकुमार तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. तेली म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून करमाळा ते विजापूर हा ३०० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. करमाळा-पंढरपूर-मंगळवेढा -उमदी-विजापूर असा ३०० किलोमीटरचा ५६१ नंबर राष्ट्रीय महामार्ग असुन करमाळा ते उमदी पर्यंतची कामे मंजूर झाली असुन ती कामे पूर्णत्वाला आली आहेत. मात्र उमदी ते विजापूर पर्यंतच्या कामास अद्याप मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे रखडलेला उमदी ते विजापूरच्या रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी विजापुरचे खासदार रमेश जिगजणी, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती तम्मानगौडा रवी पाटील, भाजपचे उमदी जिल्हा परिषद गटाचे नेते संजयकुमार तेली यांनी वारंवार निवेदन देत रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा केला.

त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यांची दखल घेत उमदी ते विजापूर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामास मंजुरी दिली असून उमदी ते कोत्याबोंबलाद या कामास ६२ कोटी रुपये तर सिद्धापुर ते विजापूर या रस्त्याच्या कामासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मंजूर कामाची लवकरच सुरवात होणार असल्याचे युवा नेते संजयकुमार तेली यांनी सांगितले. यावेळी राजु चव्हाण, चिदानंद रगटे, रवी लोणी, राजु स्वामी आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments