Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली सिव्हिलमधील 5 कोटी 30 लाखांचा निधी वितरित करण्यास मंजुरी : पृथ्वीराज पाटील

सांगली, (प्रतिनिधी) 
पद्मभूषण वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयांमध्ये विविध कामासाठी ५ कोटी, ३० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे दिली.

श्री. पाटील यांनी सांगितले की, वसंतदादा रुग्णालयात विस्तारित बाह्यरुग्ण विभाग इमारतीचे बांधकाम करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील रक्तपेढीचे नुतनीकरण करणे व पाच नवीन वार्डाच्या बांधकामासाठी तसेच अन्य कामासाठी हा निधी आलेला आहे. वसंतदादा रुग्णालयात अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती, या रुग्णालयातील पाण्याची टाकी, वाहनतळ, अभ्यागत कक्ष, आवार भिंत इत्यादींचे नव्याने बांधकाम या निधीतून होणार आहे. याच ठिकाणच्या सर्व इमारती, बाह्यरुग्ण विभाग, शौचालयांची दुरुस्ती आणि नूतनीकरण, भूमिगत मलनि:स्सारण पाईपलाईन दुरुस्ती आणि रुग्णालयातील सर्व इमारतींची दुरुस्ती यासाठीही हा निधी वितरित करण्यात येणार आहे.

या कामासाठी सन २०१७ पासून निधी उपलब्ध होत नव्हता, त्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांच्याकडे मुंबईला जाऊन बैठक लावली. पुन्हा त्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार नुकताच हा निधी वितरित करण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. सिव्हिलमधील ही सर्व कामे या निधीमुळे सुरू होण्यास मोठी मदत मिळाली आहे.

याशिवाय वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात नव्याने पाचशे खाटांच्या सुविधांसह नवीन इमारत बांधण्यासंदर्भातील प्रस्ताव ना. अमित देशमुख यांच्याकडे दिला असून त्यासाठीही पाठपुरावा चालू असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

------

Post a Comment

0 Comments