Daily Mahasatta

Daily Mahasatta

पाझर तलाव, बंधाऱ्यासाठी 13 कोटी 72 लाख मंजूर : आ. अनिलभाऊ बाबर

 विटा (मनोज देवकर )
खानापूर मतदारसंघातील पाझर तलाव आणि बंधाऱ्यासाठी 13 कोटी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली आहे.

आमदार बाबर म्हणाले, मतदारसंघात जवळपास सर्वच गावांना टेंभुचे पाणी मिळाले आहे आणि त्यामुळे मतदारसंघातील लोकांची शेतीमधील कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ज्या जमिनी पडीक व माळरान होत्या त्या जमिनी देखील आता बागायती झाल्या असून शेतकऱ्यांनी आता विविध पिके घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ठिकठिकाणी विहीर बोअरवेल घेतले जाऊ लागले असून मतदारसंघातील शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्यासाठी जलसंधारण मंत्री मा नाम शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून मतदारसंघातील पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्यासाठी मतदारसंघातील पोसेवाडी येथील तलावास 3 कोटी 83 लाख एवढा भरीव निधी आणि हिवरे येथील तलावास 4कोटी 96 लाख एवढा भरघोस निधी आणि कार्वे येथील तलावास 4 कोटी 82 लाख एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे

पाझर तलावाच्या साठवण तलावात रूपांतर केल्यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअर ला मुबलक पाणी येऊन शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामातील पिके घेण्यास मदत होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनमानात आमूलाग्र सकारात्मक बदल होणार आहे. बरेचसे क्षेत्र बागायती होणार असून शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्याचबरोबर आटपाडी तालुक्यातील पिंपरी व चिंचाळे येथील पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे नियोजित आहे त्यास ही लवकर मंजुरी मिळणार आहे त्याचबरोबर आणखी बंधारे कामे करण्याचे नियोजित आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली आहे. 

Post a Comment

0 Comments