Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाड मध्ये सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून निर्घृण खून ; घरगुती वादातून थरारक घटना

कुपवाड (प्रमोद अथणिकर )
कुपवाड परिसरातील खारे मळा येथे राहणाऱ्या तरुणाचा त्याच्याच लहान सख्ख्या भावाने कोयत्याने वार करत तसेच दगडाने ठेचून मारुन निघृण खून केला. ही घटना शनिवारी रात्री घडली. सन्या उर्फ शुभम परसमल जैन (वय 25) रा. खारे मळा कुपवाड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सन्या उर्फ शुभम परसमल जैन हा तरुण अनेक गुन्हेगारी कृत्यात सहभागी होता. याच माध्यमातून घरात देखील त्याची आरेरावी सुरु असत. शनिवारी रात्री देखील सन्या उर्फ शुभम याची त्याचाच सख्खा भाऊ शशांक उर्फ चिट्या परसमल जैन वय वर्षे 20 रा खारे मळा कुपवाड याच्याशी बाचाबाची झाल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळत आहे. या दोघा भावा मध्ये घरगुती भांडण झाले व याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले असता त्याचा भाऊ सन्या उर्फ शुभम  याच्या पाठीमागे लागून चौकामध्ये त्याच्या वर वार केला असता सन्या उर्फ शुभम खाली कोसळला व त्याच्या भावाने जमिनीवर पडलेल्या दगड त्याच्या डोक्यात घातला असता त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती समोर येत आहे.

या घटनेची माहिती कुपवाड पोलीसाना कळताच पोलीस निरीक्षक नीरज उबाळे त्याच्या टीम सह घटना स्थळी पोहचून पाहणी केली व शशांक उर्फ चिट्या परसमल जैन याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत तरुण सन्या वरती अनेक प्रकारची गुन्हे नोंद असून तो अनेक ठिकाणी मारामाऱ्या ,चोरी तसेच खंडणी असे अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्या नावावरती नोंद आहेत

या खुनाची चाहूल लागताच कुपवाड शहरात खळबळ उडाली असून संपूर्ण कुपवाड शहर हादरून गेले आहेत या खुना पाठीमागे आणखी कोण आहेत का याची सखोल चौकशी कुपवाड पोलीस करत आहेत

Post a Comment

0 Comments