Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विट्यात सहा लाखांचा गुटखा जप्त , दोघांना अटक

विटा ( मनोज देवकर )
पाच लाख सत्तावीस हजारांचा प्रतिबंधित केसरयुक्त विमल पान मसाला, व्ही १ सुगंधित तंबाकू , सॅफ्रँन ब्लेंडेड विमल पान मसाला , आर एम डी पान मसाला आणि गुटखा विटा पोलिसांनी जप्त केला. या जन आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सांगलीहून विट्यास हे दोघे स्कॉर्पियो गाडी घेऊन येत असल्याची बातमी पोलिसांनी मिळाली होती.

प्रमोद उर्फ रोहित महादेव तहसिलदार ( वय २० वर्षे) रा. संदलगा ता. चिक्कोडी ,जिल्हा बेळगाव आणि तानाजी वसंत शिंदे रा. माधवनगर मुळगाव तळेवाडी ( करगणी) ता. आटपाडी या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सहा लाख रुपयांच्या स्कॉर्पिओ गाडीसह पाच लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान संहिता १८८, २७२ , २७३ , ३२८ या कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

आज शुक्रवारी पहाटे चार च्या सुमारास रात्र गस्त दरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना त्यांच्या खास गोपनीय बातमीदारांकडून गुटख्याची वाहतूक करीत स्कॉर्पिओ एम एच १० , बी ए १११४ हि सांगली कडून विट्या कडे येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नाकाबंदी करून संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली असता आरोपी मुद्देमालासह सापडले.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली सुजित देवराय , अमर सूर्यवंशी , नवनाथ देवकाते , पुंडलिक कुंभार , अभिजित वाघमोडे या पोलिसांच्या टीम ने पार पाडली. होमगार्ड रवींद्र पवार , गणेश कोळी यांचे सहकार्य लाभले.

Post a comment

0 Comments