Daily Mahasatta

Daily Mahasatta

नाभिक समाजाच्या अडचणी दूर करा : आम. गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विटा ( मनोज देवकर )
नाभिक समाजाच्या अडचणी दूर करण्याबाबत भाजपा प्रदेश प्रवक्ते , आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या पत्राद्वारे नाभिक समाजातील गरजूंना अल्पव्याजदराने दहा ते पंधरा लाख कर्ज देण्यात यावे, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.

या निवेदनाद्वारे पडळकर यांनी पूढील मागण्या केल्या आहेत. सरकारच्या माध्यमातून कोणतीही योजना नाभिक समाजासाठी चालविली जात नाही. तरी या समाजासाठी श्रीसंत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करून त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करून अनेक योजना लागू करून कार्यान्वीत कराव्यात. जावेद हबीब सारख्या अनेक मोठ्या ब्रँडेड सलुननी बाजारात प्रवेश केलाय. त्यामुळे खोके टाकून नाभिक व्यवसायावर आपल पोट भरणाऱ्या सामान्य व्यवसायिकांच्या पोटावर पाय आलाय. अशा प्रतिकुल परिस्थीतीत टिकून राहण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य म्हणून १० ते १५ लाख रुपये कर्ज अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून देण्यात यावे.

अद्ययावत नाभिकी व्यवसायाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी प्रशिक्षण संस्थांचे जिल्हास्तरावर निर्माण करावे व त्या संस्थेमार्फत कार्यशाळा घेतल्या जाव्यात. नाभिक व्यवसाय करताना अनेक प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे विविध आजार, रोग होण्याची शक्यता असते. या रोगांमुळं व्यवसाय बंद होतो, आणि दवाखान्यासाठी पुरेसे पैसेही नसतात त्यामुळं नाभिक समाजतल्या प्रत्येकाला सरकारकडून २० लाख रुपयांचे वीमा संरक्षण मिळावे. वयाची साठी ओलांडलेल्या नंतर वैद्यकीय खर्चासह इतर खर्च वाढतो पण उत्पन्न मात्र वाढत नाही. व्यवसायावर परिणाम होतो. यामुळे सरकारकडून नाभिक समाजातील ६० वय वर्षे ओलांडलेल्या व्यावसायिकांसाठी पेन्शन योजना सुरु करण्यात यावी. मनपा, नगरपंचायत, जिल्हापरिषद, ग्रामपंचायती, बस स्टँड आदी जागांवर जे गाळे काढले जातात तिथं नाभिक समाजातील व्यवसायीकांसाठी गाळे काढण्यात यावेत.

पन्हाळगडाच्या पायथ्याशी प्रति शिवाजी म्हणून ज्यांची इतिहासात ओळख आहे असे शूरवीर शिवा काशीद यांचे स्मारक दुर्लक्षित आहे. येथे लाईट, पाणी अशा मुलभूत सोई नाहीत. हजारो पर्यटक दर्शनासाठी या समाधीस्थळी येतात परंतु गाईड नसले कारणाने पर्यटकांना योग्य ती ऐतीहासिक माहिती मिळत नाही. तसेच या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची गरज आहे. तरी या मुलभूत सोई करण्यात याव्यात, अशी मागणी आ. पडळकर यांनी केली आहे.
--------------------------------------
वीर शिवा काशिद स्मारक
सुशोभिकरणाला ५० लाखांचा निधी

बुधवार पेठ ता. पन्हाळा येथील वीर शिवा काशिद यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यासाठी २५ लाख रुपये आ. पडळकर यांच्या विकासनिधीतून आणि आ. सदाभाऊ खोत यांच्या फंडातून २५ लाख रु. निधी देणार असल्याचे पडळकर यांनी जाहीर केले आहे. तसे पत्र त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना दिले आहे."

Post a Comment

0 Comments