Daily Mahasatta

Daily Mahasatta

शेतकर्यांच्या हितासाठीच दूध संघाची निर्मिती : राहुल महाडीक

 वाळवा ( रहिम पठाण )
वाळवा आणि शिराळा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या हितासाठीच दूध संघाची निर्मिती करण्यात आली आहे, असे मत राहुल महाडिक यांनी व्यक्त केले.

वाळवा- शिराळा को. ऑप डेअरीच्या नविन सभासद नोंदणीच्या निमित्ताने ताकारी ता. वाळवा येथे राहुल महाडीक भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांनी ताकारी परीसरातील शेतकरी व दुध उत्पादकांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना दोन्ही तालुक्यातील शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊनच हे काम हाती घेतले आहे असे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर तरुण युवकांच्या हाती एक चांगला रोजगार ही उपलब्ध होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने जगन्नाथ (आण्णा) माळी सभापती जि. प. सांगली जेष्ठ नेते मा. बाबासाहेब पवार, महाडिक मल्टिस्टेट चे संचालक प्रा. प्रदीप पाटील सर, ताकारी शाखेचे व्हा. चेअरमन संजय सावंत,सुधीर पाटील, धनाजी भोसले, राजाराम पवार,षअधिक पवार अमोल पवार,दिलीप पाटील,आनंदराव पाटील, सरगम मुल्ला, ब्रम्हा पाटील, सतीश जाधव यांच्यासह शेतकरी बांधव, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments