विटा ( मनोज देवकर )
वलखड ग्रामपंचायत ने दलित वस्ती सुधार योजनेतून गेल्या वर्षी हाय मास्ट पथदिवे आणि खांब खरेदी केले होते. गेले वर्षभर खरेदी केलेल्या वस्तू धूळखात पडलेल्या असून त्या बौद्ध समाज मंदिर या नियोजित जागी लावण्यात आलेल्या नाहीत असा आरोप वलखड मधील काही नागरिकांनी केला आहे.
वलखड मधील बौद्ध समाज मंदिर , लक्ष्मी मंदिर परिसरात वर्दळ असते. येण्या जाण्याच्या या मार्गावर पथदिवे लावण्यात यावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. पण ग्रामपंचायत मधील पदाधिकारी स्वतः च्या घराजवळ पथदिवे लावण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नारायण जगताप यांनी केला आहे. समाज मंदिरात आंबेडकर जयंती , लक्ष्मी मंदिरात इतर अनेक कार्यक्रम होत असतात. तरी या मार्गावर पथदिवे बसवण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सदर निवेदनावर नारायण जगताप , गौतम वाघमारे, राजेंद्र जगताप ,उत्तम जगताप , तानाजी जगताप , रोहित जगताप उद्धव जगताप यांच्या सह्या आहेत.

0 Comments