Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

तांदळगाव, पारे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला

विटा : पारे येथील बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार आ. अनिलभाऊ बाबर. यावेळी सौ. शोभाताई बाबर, सुहास बाबर, धनाजी शेळके, किरण पाटील उपस्थित होते.

विटा ( मनोज देवकर )

खानापूर तालुक्यातील तांदळगाव व भडकेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर पारे ग्रामपंचायत मध्ये आमदार अनिल बाबर गटाचे सात सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. चार जागांवर निवडणूक होत आहे. भडकेवाडीत माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे समर्थकांच्या पाच जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर दोन अपक्ष बिनविरोध निवडून आले आहेत.

तांदळगाव, पारे गावात बाबर समर्थकांचे बहुमत असणार आहे. पारे गावात बाबर गटाचे सौ. मालन बाळासो साळुंखे, सौ. सुवर्णा शहाजी पांढरे, अजित उद्धव सुर्यवंशी, उज्वला तुकाराम साठे, जयप्रकाश पांडुरंग थोरात, सौ. अपर्णा संपत कदम, सौ. सुजाता अंकुश वाघमोडे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित चार जागांसाठी मतदान होणार आहे.

तालुक्यात १०८ जागांमधील बावीस जागा बिनविरोध झाल्या असून ८६ जागांसाठी मतदान होणार आहे. शेंडगेवाडी येथील एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तांदळगाव आणि पारे या दोन ग्रामपंचायतींवर भगवा फडकल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार अनिलराव बाबर गटाने तांदळगाव गावातील ७ पैकी ७ जागा बिनविरोध केलेल्या आहेत.

आमदार बाबर गटाचे निष्ठावंत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत चव्हाण यांनी तांदळगाव ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासूनच व्यूह रचना केली होती. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच ७ जागांसाठी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यावेळीच हि ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान आज अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पारे ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण ११ जागांपैकी ७ जागा आमदार बाबर गटाने बिनविरोध जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे येथे यावेळी आमदार बाबर गटाने आमदार बाबर यांचे स्वीय सहाय्यक शहाजी पांढरे यांच्या पत्नीलाच उमेदवारी देऊन निवडणुकीत रंगत आणली होती. तसेच उर्वरित ४ ही जागा मोठ्या फरकाने जिंकण्याचा मानस देखील प्रमुख कार्यकर्त्यानी बोलून दाखवला आहे .

आज सोमवारी सायंकाळी पारे येथील बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे फेटा ,बुके देऊन आमदार बाबर यांनी सत्कार केला. यावेळी आमदारांच्या पत्नी सौ शोभाताई बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर,धनाजी शेळके, किरण पाटील यांच्यासह पारे गावातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भडकेवाडी बिनविरोध , सुहास शिंदे गटाची सत्ता :

भडकेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत एकूण सदस्य ७ पैकी ५ सदस्य बिनविरोध झाले. बिनविरोध निवड झालेल्या सदस्यानी खानापूर घाटमाथ्याचे नेते मा. सुहास (नाना) शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये श्री. संजय ज्ञानदेव पाटील, सौ. संगीता सोपान जाधव, श्रीमती शांताबाई नाथा शेंडगे, व सौ. शैलजा युवराज जाधव, श्री तानाजी संभाजी कदम यांची बिनविरोध निवड झाली. हे सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास (नाना) शिंदे यांच्या गटाचे आहेत.

यावेळी खानापूरचे नगराध्यक्ष मा. तुषार मंडले, गटनेत्या सौ. मंगल खंडू मंडले, उपस्थित सत्कार करण्यात आला. तसेच दत्तात्रय जगताप (महाराज) मा. बाळूतात्या जाधव, मा. राजाराम शंकर जाधव,सुदाम शामराव जाधव मा. युवराज तानाजी जाधव, मधुकर बाळासो जाधव, सुशिल शिवाजी बुर्ली, रोहित प्रकाश जाधव तसेच माजी सरपंच रायसिंग मंडले राजेंद्र टिंगरे, राजन पवार बलराज माने, राहुल ठोंबरे तसेच भडकेवाडीतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments