Daily Mahasatta

Daily Mahasatta

वेश्या अड्डयावरील छाप्यात पोलीस निरीक्षकालाच अटक

दोन महिलांची सुटका : सांगली पोलीसांची कारवाई 

सांगली (प्रतिनिधी)
सांगली येथील कर्नाळ रोडवरील एका हॉटेल मध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाइल वेश्या अड्ड्यावर सांगली ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला अन् सहाजणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या सहाजणांमध्ये आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर या महाशयांचा समावेश आहे.

सांगली शहरातल्या कर्नाळ रोडवरील हॉटेल रणवीर याठिकाणी छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने हॉटेल रणवीरवर छापा टाकत हाय प्रोफाईल वेश्या अड्डा उद्ध्वस्त केला आहे. पोलिसांनी या छाप्या मध्ये सहा जणांना अटक केली आहे. हॉटेल चालकासह ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या मध्ये आटपाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकाचीही समावेश आहे. अरुण देवकर असे पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्याच बरोबर हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले,सत्यजित पंडित,अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासर्वांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
....................................

पोलीस खाते बदनाम..
काही दिवसांपूर्वी कडेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विपीन हसबनीस याला युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता आटपाडी पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षकला थेट वेश्या अड्डयावर अटक करण्यात आल्याने पोलीस खात्याचे धिंडवडे निघाले आहेत. पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी संबंधित अधिकार्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

Post a Comment

0 Comments