विटा ( मनोज देवकर )
एकदा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर त्या त्या गावातील लोकांना त्यांच्या पद्धतीने काम करून देणे यात नेत्याचे मोठेपण असते. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीचे सर्व श्रेय स्वतःच घेणे चुकीचे आहे, असे परखड मत माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी व्यक्त केले. विटा नगरपालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अॅड. पाटील म्हणाले, माहुली मध्ये स्थानिक पातळीवर समन्वय साधून पॅनल उभे करण्यामध्ये आम्ही कमी पडलो. धनशक्तीच्या जोरामुळे पारे आणि खंबाळे मध्ये आम्हाला सत्तेपासून दूर रहावे लागले. विरोधक आमच्यावर दडपशाही आणि धनशक्तीचा आरोप करतात. ग्रामीण भागामध्ये चांगलं काम करत असल्याचा प्रचार करतात. बारा ग्रामपंचायती तुमच्याकडे असताना त्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये आम्ही विजय मिळवला आहे आणि चार ग्रामपंचायती मध्ये योग्य सत्तेमध्ये वाटा ठेऊन पुढे जात आहोत. याचं ज्याचे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे . असे प्रतिपादन विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष , युवानेते वैभव पाटील यांनी केले.
यावेळी ते म्हणाले , "तेरा ग्रामपंचायती मध्ये माहुली वगळता शिवसेनेची सत्ता होती. गेल्या वर्षभरापासून आम्ही राष्ट्रवादीचे काम करत आहोत. त्याची परिणीती म्हणून भिकवडी , मंगरूळ , शेंडगेवाडी , पोसेवाडी या ग्रामपंचती राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. तांदळगाव , देवीखिंडी , भडकेवाडी आणि मेंगाणवाडी या ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी समनव्य साधून निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. या चार ही ठिकाणी राष्ट्रवादीला सन्मानजनक सत्तेत वाटा मिळेल."
सत्तेमध्ये किती वाटा आहे. यापेक्षा सर्वसामान्य जनतेसाठी चांगलं काम करण्याचं धोरण माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी ठेवलं. त्यामुळेच आम्हाला ग्रामपंचायत ला यश मिळाले आहे. नरसेवाडी मध्येही चार सदस्य आमच्या गटाला दिलेले आहेत. विसापूर सर्कल मध्येही अनेक ग्रामपंचायत मध्ये आम्हाला यश मिळाले आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

0 Comments