Daily Mahasatta

Daily Mahasatta

" विटेकरांनो, मी पुन्हा येईन " : जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी

विटा ( मनोज देवकर )
विटा शहर म्हणजे एक स्वच्छ नगरी आहे, अशी विट्याची ओळख आहे. कोणतीही स्पर्धा आली, स्वच्छतेच्या संदर्भात स्वच्छ सर्वेक्षण असेल , माझी वसुंधरा अभियान असेल , विटा शहर या सर्व स्पर्धेत जिल्ह्याचं नेतृत्व करेल असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. जेंव्हा तुम्ही " माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण " मध्ये अव्वल मानांकन मिळवाल तेंव्हा तुमचा सत्कार करण्यासाठी "मी पुन्हा येईन" असे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी म्हणाले.

आज जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी विटा शहर आणि नगरपरिषदेच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी नगरपालिकेत दोन लाख नव्वद हजार रुपये किंमतीच्या एअर पुरीफायर चे जिल्हाधिकाऱ्यांनी लोकार्पण केले. नगरपालिका आवारात " इ बाईक , कंपोस्ट खते , बुक बँक या उपक्रमाची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील, नगरसेवक दहावीर शितोळे, संजय तारळेकर, सचिन शितोळे, अविनाश चोथे, प्रशांत कांबळे, आरोग्य निरिक्षक आनंदा सावंत आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना, "स्वच्छ सर्वेक्षण मध्ये गेली काही वर्षे विटा शहराने खूप चमकदार कामगिरी केलेली आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी, लोकप्रतिनिधींचा आत्मविश्वास आणि नागरिकांची सजगता पाहता विटा शहर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये फाइव्ह स्टार मानांकन मिळवेल असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला. स्वच्छतेची चळवळ ही जोपर्यंत लोकचळवळ होत नाही तोपर्यंत शाश्वत विकास साधता येत नाही. लोकांच्यात पर्यावरण विषयक जागरूकता येण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. याबाबतीत जिल्हा प्रशासनाकडून जी काही मदत लागेल ती देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आश्वस्त केले. सर्व नगरसेवकांना बॅटरी वर चालणाऱ्या " इ बाईक " वापरायला सांगा अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी अतुल पाटील यांना केली .

Post a Comment

0 Comments