Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्हा गवंडी व सुतार कामगार संघटनांच्या वतीने शाळेतील मुलांना खाऊचे वाटप

वाळवा ( रहिम पठाण)
२६जानेवारी निम्मित सांगली जिल्ह्य गंवडी सुतार कामगार संघटना यांच्यावतीने इस्लामपूर परीसरातील शाळांच्या मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे उपस्थित होते. यावेळी आप्पानी संघटनेच्या उपक्रमांचे कौतुक केले. समाजातील लोकांनी अशा प्रकारचे उपक्रम अनुकरण करने गरजेचे आहे समाजउपयोगी उपक्रमातून समाजाशी असणारे नाते घट्ट होण्यास मदत होत असते अशा भावना ही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मुलांची अभ्यास वृत्ती वाढावी म्हणून आणि ज्ञानसंपन्नतेसाठी शाळेसाठी विविध पुस्तके ही भेट देण्यात आली. ज्या माध्यमातून उद्याची पिढी घडण्यास मदत होईल. समाजाची खरी पारख मुलांना होण्यास मदत होईल. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. निवास गायकवाड एकलव्य संकुलाचे आदरणीय श्री विजय महाडीक विनोद गायकवाड रणजित कदम ही उपस्थित होते कांबळे सर यानी स्वागत केले तर संकुलाच्या वतीने महाडीक सरानी आभार मानले.

Post a Comment

0 Comments