Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

शिक्षिकेचा कारनामा; सेक्सच्या बदल्यात विद्यार्थ्यांना देत होती डिग्री

मुंबई (प्रतिनिधी)
मदुरैई कामराज युनिव्हर्सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शारिरीक संबध ठेवण्यासाठी चांगले गुण आणि पैसे देणार्या एका महिला असिस्टंट प्रोफेसरला अखेर जामीन मंजूर झाला आहे. एका से’क्स स्कॅन्डलमध्ये आरोपी असलेली महिला प्रोफेसरला मद्रास हायकोर्टाने अटक केल्यानंतरच्या ११ महिन्यानंतर जामिन दिला आहे.

कोर्टाने आदेश दिले की निर्मला देवी यांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि मिडियामध्ये कुठल्याही प्रकारची मुलाखत देऊ नये जेनेकरून वाद निर्माण होऊ नये. याच्याआधी कोर्टाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळला होता.

देवंगा कॉलेज ऑफ आर्टसमध्ये असिस्टंट प्रोफेसरचे काम पाहणाऱ्या निर्मला देवी यांना २०१९ मध्ये १६ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्यांचा कॉलेजच्या मुलींसोबतचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता. यानंतर कॉलेज आणि एका महिला फोरमच्या तक्रारीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती. ऑडिओ क्लीपमध्ये कमला देवी मुलींना काही अधिकाऱ्यांसोबत शारिरीक संबंध बनवण्यासाठी सांगत होत्या. अटक करण्याच्या आधी पुर्ण चौकशी करण्यात आली आणि त्यांचे निलंबण करण्यात आले.

ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण खुप चिघळले होते. यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात आले होते. देवी यांची चौकशी करण्यात आली. असिस्टंट प्रोफेसर वी मुरूगन आणि रिसर्चचा विद्यार्थी करूप्पासामी या दोघांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

हायकोर्टाने त्यांचाही जामिन अर्ज फेटाळला होता पण सुप्रिम कोर्टाने त्यांचा जामिन मंजुर केला. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सीआयडीने २०० पानांची चार्जशीट कोर्टाकडे सादर केली होती. त्याआधी जुलै महिन्यात १६०० पानांची चार्जशीट कोर्टाकडे सादर करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments