Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वैभव पाटील यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

 विटा ( मनोज देवकर )
आज दुपारी विट्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात जोरदार निदर्शने केली. "वाह रे मोदी तेरा खेल, सोने के भाव में बिकता तेल " अश्या घोषणा देत विट्याच्या माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान स्थायी समिती सदस्य युवानेते वैभव सदाशिवराव पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

देशात प्रचंड महागाई वाढली आहे. गेल्या सहा वर्षात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून वारेमाप कर आकारणी केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल च्या किमती कमी असताना देखील पेट्रोल ९१ रुपये प्रति लिटर आणि स्वयंपाकाचा एल पी जी गॅस आठशे रुपयांच्या वर महागला आहे. असे म्हणत युवक राष्ट्रवादी चे नेते वैभव पाटील यांनी मोदी सरकारच्या कामागिरी वर रोष व्यक्त केला.

नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य जनतेचं सरकार म्हणून सत्तेत आलेले मोदी सरकार त्याच जनतेच्या समस्यांवर बोलायला देखील तयार नाही. तेलाची आणि गॅस ची होणारी दरवाढ ही अन्यायकारक आहे. मोदी सरकार निर्दयीपणे सर्वसामान्यांच्या खिशाला चाट लावत असल्याची टीका वैभव पाटील यांनी केली.

तेल दरवाढीच्या परिणामामुळे जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस राजू जानकर , खानापूर विधानसभा अध्यक्ष हरी माने , विटा शहर कार्याध्यक्ष विशाल पाटील , युवक अध्यक्ष सिद्धार्थ सचिन शितोळे , सत्यजित सुजित पाटील , विनायक कचरे , अक्षय जाधव , महेश फडतरे , सुनील गायकवाड उपस्थित होते. 

Post a comment

0 Comments