Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

उत्कृष्ट व्यावसायिकांचा आदर्श समाजासमोर यावा : बाळासाहेब कलशेट्टी

सांगली ( प्रतिनिधी)
उत्कृष्ट, कर्तृत्ववान व्यावसायिकांचा आदर्श लोकांपुढे आल्यास अनेकांना प्रोत्साहन मिळेल, असे मत सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष लायन बाळासाहेब कलशेट्टी यांनी व्यक्त केले. ते रोटरी क्लब सांगली सिटीच्या व्यवसाय सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर नितीन शहा प्रमुख अध्यक्षस्थानी होते. रोटरीच्या व्होकेशनल मंथमध्ये पाॅल हॅरिस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मारक येथे समारंभ झाला.

स्वागत व प्रास्ताविक स्नेहल गौंडाजे यांनी केले. श्री. कलशेट्टी, श्री. शहा, रोटरी क्लब सांगली सिटी चे अध्यक्ष मंदार बन्नेे, सेक्रेटरी शशिकांत चौगुले यांच्या हस्ते यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सांगलीतील राजेंद्र कृष्णा चव्हाण, दिनेश कुडचे, विद्या प्रवीण माळी, अनिल गजानन चव्हाण व रेणुका विजय देसाई या यशस्वी व्यावसायिकांचा व्यवसाय सेवा पुरस्कार देऊन रोटरीतर्फे गौरव करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन हा गौरव झाला.

यावेळी बोलताना संगणक तज्ञ दिनेश कुडचे यांनी कोरोना काळातील तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सांगितले. विद्या माळी यांनी निसर्गानुकूल वास्तुरचना याबाबत माहिती देऊन रोटरीने केलेल्या सत्काराबद्दल ऋण व्यक्त केले. असिस्टंट गव्हर्नर नितीन शहा यांनी रोटरीच्या पोलिओ निर्मूलन योजनेसह संपूर्ण साक्षरता मोहिमेविषयीची माहिती दिली.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे कलशेट्टी म्हणाले, अनेक व्यावसायिक आपल्या कर्तृत्वाने मोठे होतात. मात्र त्याची माहिती समाजापर्यंत जात नाही. रोटरीने असे लपलेले हिरे शोधून त्यांचा सन्मान केला आहे हे कौतुकास्पद आहे. यावेळी शशिकांत चौगुले, प्रशांत माने, पार्थ माळी, सुमेर जाजू, अविनाश पोळ, मानतुंग गौंडाजे यांचा विविध उपक्रमाबद्दल सत्कार झाला.

इव्हेंट चेअरमन मारुती गायकवाड यांनी रोटरी व अन्य संस्थामार्फत सांगलीत होणाऱ्या जॉब फेअर विषयीची माहिती दिली. प्रेमराज जाजू यांनी आभार मानले. प्रशांत माने व प्रशांत आगवेकर यांनी सूत्रसंचालन केले. रणजीत माळी, शिवचरण आगवेकर व रोटरी सदस्यांनी संयोजन केले. यावेळी के. एस. भंडारे, आर्किटेक्ट प्रवीण माळी उपस्थित होते.


Post a comment

0 Comments