Daily Mahasatta

Daily Mahasatta

मित्राला आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला आणि साजरा झाला अनोखा 'आनंद सोहळा '

पेठ (प्रतिनिधी)
समाज माध्यम म्हणून नावारूपास आलेल्या वाटसप ग्रुप च्या माध्यमातून एकत्र आलेल्या 1996 बॅच च्या वर्गमित्रांनी रियाज मुल्ला या मित्राला आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल ,श्रीफळ, नारळ, शिल्ड देऊन सर्वांच्या वतीने सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे सुमारे २० वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रमंडळीचा हा आनंद सोहळा ठरला.

गेट टूगेदर च्या कार्यक्रमासाठी 1996 बॅच च्या वर्गातील सर्व मुले मुली एकत्र यावीत यासाठी 2015 साली व्हाटसअप ग्रुप चालू केला. शिक्षणासाठी ,काम धंद्याच्या निमित्त वेगळी झालेली ,काहीसे दुरावलेले मित्र व्हाटसअप च्या माध्यमातून 19 वर्षानी एकत्र आले. वयाच्या चाळीशीत एकत्र येऊन एकमेकांची आधार बनू लागले. परत एकदा ते लहानपणीच्या दिवसात रममाण होऊ लागले. वर्गमित्राच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकत्र येऊन काम धंद्याचा ताण विसरून , सुखाचा वेळ , आचार विचारांची देवाण घेवाण होऊ लागली.

2020 - 2021 साठी या 1996 बॅच मधील दैनिक महासत्ताचे पत्रकार रियाज मुल्ला यांना आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार जाहीर झाला अन वर्गमित्रांनी सोशल मीडियावर वर अभिनंदन चा वर्षाव केला.1996 बॅच चे युवा नेते अतुल पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाला त्याच दिवशी सत्कार केला. मात्र बरेच मित्र कामानिमित्त बाहेर गावी असलेने 29 रोजी सर्व मित्र एकत्र येऊन सत्कार चा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी सतीश पाटील, इरफान ढगे, राहुल पवार, सुनील सपकाळ, तुळशीदास पिसे, हणमंत कदम, माणिक माळी, सुभाष भांबुरे, संतोष गायकवाड, शिवाजी शेलार, जयंत पाटील, संतोष पवार, अमित पवार, शशिकांत जाधव, सचिन दाभोळे, रमेश माळी, जयदीप कदम, सचिन खंकाळे, महादेव थोरावडे, उमेश वारके, रमजान संदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments