Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली महापालिकेच्या गटनेता पदी विनायक सिंहासने यांची निवड

सांगली (प्रतिनिधी )
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या गटनेता व सभागृह नेते पदी नगरसेवक विनायक सिंहासने यांची बुधवारी विश्रामबाग येथील आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे होते.

आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेशभाऊ खाडे, महापौर गीताताई सुतार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाशतात्या बिरजे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदभाऊ देशपांडे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, माजी महापौर संगीता खोत, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, नगरसेविका कल्पना कोळेकर, नगरसेविका लक्ष्मीताई सरगर, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, नगरसेवक गजानन मगदूम, नगरसेवक अजिंक्य पाटील, नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेवक इम्रान शेख आदी उपस्थित होते. संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी स्वागत केले. जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत वाघमोडे यांनी आभार मानले.

Post a comment

0 Comments