Daily Mahasatta

Daily Mahasatta

स्वामीजी आणि नेताजींचे कार्य म्हणजे आत्मोन्नती ते राष्ट्रोन्नती चा प्रवास : प्रा. ईश्वर रायांनावर

सांगली (प्रतिनिधी)
स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य म्हणजे आत्मोन्नती ते राष्ट्रोन्नतीचा प्रवास आहे, असे मत प्रा. ईश्वर रायांनावर यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगलीच्या वतीने दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंती (१२जाने) ते नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती (२३ जानेवारी) हा कार्यकाळ 'युवकसप्ताह' म्हणून साजरा करण्यात येतो. या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रतिमा पूजन, विविध कार्यक्रम, उपक्रम, गतिविधी, व्याख्याने, स्पर्धा आयोजित करण्यात आले. तसेच सांगली, विश्रामबाग व मिरज या नगरातील मुख्य चौकामध्ये 'पथनाट्य' सादर करण्यात आली.

या युवक सप्ताहाचा समारोप नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिवशी 23 जानेवारी रोजी 'युवागर्जना' या कार्यक्रमाने करण्यात आला. या कार्यक्रमाला 'विवेकानंद वैदिक प्रतिष्ठान' सांगली चे प्रमुख विश्वस्त डॉ. राम लाडे व प्रमुख वक्ते म्हणून प्रा. ईश्वर रायांनावर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभाविप चे सांगली महानगर अध्यक्ष प्रा. सुभाष मालगावे यांनी केले. व वर्षभरातील कामाचा आढावा महानगरमंत्री विशाल जोशी यांनी मंत्री प्रतिवेदनातून मांडला.
यानंतर अभाविपचे सांगली जिल्हाप्रमुख प्रा. गुरू वाणी यांनी २०१९-२० ची महानगर कार्यकारणी विसर्जित झाल्याचे जाहीर केले. आणि २०२०-२१ साठीची नूतन कार्यकारिणीची घोषणा केली. ती पुढीलप्रमाणे..

महानगर अध्यक्ष -प्रा.सुभाष मालगावे
महानगर मंत्री - विशाल जोशी
महानगर सहमंत्री-रोहन भोरावत
महानगर सहमंत्री-ऋषीकेश पाटील
कलामंच प्रमुख-हर्षवर्धन कांबळे
TSVK प्रमुख-ओंकार बसरर्गी
SFD प्रमुख -मिहीर पोंक्षे


मिरज नगर
नगर अध्यक्ष -प्रा.विनायक होनमोरे
मंत्री-प्रथमेश जाधव
सह मंत्री-प्रफुल्ल पाटील
महाविद्यालयात प्रमुख-आदेश खांडेकर
विद्यार्थिनी प्रमुख-श्रेया कुलकर्णी
कलामंच प्रमुख-दऱ्याप्पा खोत
SFS प्रमुख- अभिजीत पाटील
सोशल मिडिया-प्रसिद्धी-मुजममिल गिरगावे
सदस्य- प्रा.स्नेहा छत्रे
प्रा.तुषार कुलकर्णी

विश्रामबाग नगर
नगर अध्यक्ष-प्रा.गौरी बेडेकर
मंत्री- विश्वजीत भोसले
सह मंत्री- सत्यजित राजोपाध्ये
महाविद्यालयात प्रमुख-आरोह कुलकर्णी
विद्यार्थिनी प्रमुख-श्रुती पाटील
कलामंच प्रमुख- दिव्या कुलकर्णी
SFD प्रमुख- विनीत लुगडे
SFS प्रमुख-रोहित माने
सदस्य- शुभम कांबळे

सांगली नगर
नगर अध्यक्ष -प्रा.शंभुराजे खांडेकर
मंत्री-मधुरा पाटील
महाविद्यालयात प्रमुख-सुदर्शन बंडगर
विद्यार्थिनी प्रमुख-दया उगले
कलामंच प्रमुख-अनुश्री विसपुते
सदस्य- प्रियांका माने
सायली जाधव
अनुज सुतार
प्रा.हर्षा बधे
प्रा.वैभव पाटील
भारत मातेच्या जयघोषात सर्वानी अभाविपच्या माध्यमातून राष्ट्रसेवेची जबाबदारी स्वीकारली.

डॉ. राम लाडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना छात्रशक्तीचे महत्त्व विषद केले व छात्रशक्ती हीच दंडशक्ती कशी होऊ शकते हे सांगितले. प्रमुख वक्ते प्रा. ईश्वर रायांनावर यांनी स्वामी विवेकांनंदांच्या चरित्रातील घटनांचे दाखले देऊन आजचा युवक कसा असावा हे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच स्वामीजी आणि नेताजींचे कार्य म्हणजे आत्मोन्नती ते राष्ट्रोन्नती चा प्रवास" असल्याचे सांगितले. यावेळी सांगली महानगरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते. पसायदानाने 'युवागर्जना' हा विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments