Daily Mahasatta

Daily Mahasatta

अडतीस वर्ष ' त्यांनी ' ध्वजारोहणाची जबाबदारी पार पाडली ; सदाशिवभाऊंनी केला सन्मान

विटा (प्रतिनिधी)
' अडतीस वर्षे अकरा महिने तीस दिवस श्रीकांत शितोळे यांनी विटा नगरपालिकेला अत्यंत प्रामाणिकपणे सेवा दिली. शिपाई पदावर काम करत असताना त्यांनी रोजच्यारोज दिवस उगवताना ध्वज चढवणे व न चुकता दिवस मावळताना तो उतरणे या कामात त्यांनी कधीही कुसूर केली नाही. त्यांच्या कामातील सातत्य कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी श्रीकांत शितोळे यांचे कौतुक केले.

विटा पालिकेतील कर्मचारी श्रीकांत शितोळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात अॅड सदाशिवराव पाटील बोलत होते. ते म्हणाले, मी आपल्याला विनंती करतो की जसे विटा नगरपरिषद चे रिटायर कर्मचारी इनामदार यांना विनंती केली होती की गेल्या 40 वर्षांपासून विटा नगरपालिकेमध्ये गणपतीची आरती ही प्रत्येक महिन्याच्या संकष्टीला न चुकता होते, ती नियमित करावी. त्याचप्रमाणे मी शितोळे यांना विनंती करतो की आपणही 26 जानेवारी,1 मे व 15 ऑगस्ट रोजी आपण ध्वजारोहणाला उपस्थित राहून ही सेवा वर्षातून तीन दिवस आम्हाला पूर्ववत द्यावी.

इथून पुढचा काळ आपल्याला निरोगी लाभो तसेच उरलेले सर्व आयुष्य हे आपण समाज कारणासाठी द्यावे याच सदिच्छा व शुभेच्छा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव साहेब यांनी केले तर नगरसेवक सुभाष भिंगारदेवे, प्रकाश गायकवाड, बाळासाहेब निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आभार अविनाश चोथे यांनी मानले यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, नगरसेवक संजय तारळेकर, माजी उपनगराध्यक्ष अॅड सचिन जाधव, प्रशांत कांबळे, विनोद पाटील, गजानन निकम, कुलदीप भिंगारदेवे तसेच विटा नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments