Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कोरोनाने निधन; भारती विद्यापीठातर्फे वारसांना पाच लाखांचा धनादेश सुपूर्द

कडेगाव ( सचिन मोहिते)
वांगी येथील स्वर्गीय अधिकराव पोपट कांबळे हे भारती विद्यापीठाचे तंत्रनिकेतन महाविद्यालय पलुस येथे सेवेत कार्यरत होते. त्यांना कोरोना महामारीच्या काळात कोरोनाची लागण झालेली. त्यामध्ये अधिकराव कांबळे यांचे दुर्दैवी निधन झाले होते. आज त्यांच्या कुटुंबियांना भारती विद्यापीठाच्यावतीने ५ लाखांच्या मदतीचा धनादेश सोपविण्यात आला.

भारती विद्यापीठ संस्थेने कांबळे यांच्या पश्चात असणारे पत्नी, मुलगा यांना आर्थिक मदत म्हणून रुपये ५ लाखाचा धनादेश मा. नाम. डॉ. विश्वजीत कदम (कृषी व सहकार राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते व मा . शांताराम बापू कदम (चेअरमन सागरेश्वर सहकारी सूतगिरणी लिमिटेड, कडेगाव) यांच्या उपस्थितीत तसेच वांगी गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा व पत्नी श्रीमती मनीषा अधिकराव कांबळे यांच्याकडे सुपूर्द केला .

Post a Comment

0 Comments