Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वाळवा तालुक्यात बिबट्याचा थरार, नागरिकात भितीचे सावट

पेठ ( रियाज मुल्ला)
पेठ ता, वाळवा येथील माळी मळ्यातील मळरान भागात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील गोळेवाडी ते नायकलवाडी परिसरात अंदाजे 60 एकर उसाचे क्षेत्र आहे. परिसरात वाडी वस्ती जवळ च आहेत. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुधाचा व्यसाय केला जात असल्याने शेतात शेड बांधून त्याठिकाणी जनावरे बांधली जातात. या ठिकाणी असणाऱ्या शेळ्या मेंढ्या कुत्रे यांच्या आशेने या भागात बिबट्याचा वावर वाढला असून अंकुश रामचंद्र माळी यांच्या रेडकावर प्राणघातक हल्ला करून त्याचा फडशा पाडला. तसेच 2 कुत्र्यावर पण हल्ला झाला आहे.

वनाधिकारी आर. बी. पाटोळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून रात्रीच्या वेळी शेतात जाताना टॉर्च किंवा शेकोटी पेटवावी ,तसेच स्वतःहून बिबट्या वर हल्ला करू नये असे आवाहन केले आहे.बऱ्याच जणांनी प्रत्यक्ष बिबटया पाहिल्याचे सांगत असून त्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी होत असून उसाचा परिसर मोठा असलेने दिवसा उजेडी शेतात जाण्यास शेतकरी वर्ग घाबरत आहे.

Post a comment

0 Comments