Daily Mahasatta

Daily Mahasatta

आर. आर. पाटील होमिओपॅथिकमहाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

सांगली (प्रतिनिधी)
आर. आर. पाटील होमिओपॅथिक महाविद्यालय, सांगली येथे प्रजासत्ताक दिन घाटगे हॉस्पिटल च्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक डॉ. शरद घाटगे यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एच. एम. एस. चे विद्यार्थी इरम, फैजा व रोहन यांनी केले.

या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. जयकुमार भानुसे, मेडिकल डायरेक्टर डॉ. पराग बापट व सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी , विद्यार्थिनी व घाटगे हॉस्पिटल चे स्टाफ उपस्थित होते.विश्वजीत सावंत याने आभार मानले.

Post a Comment

0 Comments