Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

पंचमुखी गणपती मंदिरामागील जागेत मोफत पार्किंग व्यवस्था करा : मनसे ची मागणी

विटा ( मनोज देवकर )
विटा शहरामध्ये पार्किंग ची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे मायणी रस्त्यावरील पंचमुखी गणपती मंदिरामागील जागेत मोफत पार्किंग व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
तालुकाध्यक्ष साजीद आगा यांनी केली.

याबाबत तहसीलदार ॠषिकेत शेळके यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे, शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने बाहेरून कामानिमित्त येणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे, त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत असते. नागरिकांना चार चाकी वाहने , मोटारसायकल उभ्या करण्यासाठी अधिकृत वाहनतळ नसल्याने लोक छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याकडेला वाहने उभी करतात. अधिकृत वाहनतळ नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, त्यामुळे पंचमुखी गणपती मंदीराच्या मागील खुल्या जागेत शासनाने पार्किंग ची व्यवस्था करावी, असे निवेदनात म्हंटले आहे.

या निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष साजिद आगा , सूरज तांबोळी, अपूल बुधावले, प्रकाश देवकर, सुजित पोतदार यांच्या सह्या आहेत.

Post a comment

0 Comments