Daily Mahasatta

Daily Mahasatta

कवठेमंहकाळ पत्रकार संघाला सर्वतोपरी सहकार्य करणार : आम. सुमनताई पाटील

कवठेमहांकाळ ( अभिषेक साळुंखे)
कवठेमहांकाळ तालुका पत्रकार संघाने नेहमीच विविध उपक्रम राबवून स्वतःचे वेगळेपण निर्माण केले. आगामी काळात पत्रकार संघाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमदार सुमनताई पाटील यांनी दिली.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात कवठेमहांकाळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या कोविड योद्धा पुरस्कार समारंभात बोलत होत्या. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने कोविड योद्धा पुरस्कार तहसीलदार बी. जे. गोरे, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्तात्रय पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश गडदे, मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्र आगळगावचे वाहनचालक रावसाहेब सदामते, आनंदराव माने, अजित बेडगे आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. यावेळी सत्कारमूर्तीनी मनोगते व्यक्त केली.

आमदार पाटील म्हणाल्या,तालुका मराठी पत्रकार संघाने नेहमी विविध उपक्रम राबविले आहेत.यंदा पत्रकार संघाने विविध स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्काराने गौरव करून स्वतःचे वेगळेपण निर्माण केले आहे,असे मत व्यक्त केले

पंचायत समिती सभापती विकास हाक्के म्हणाले, कोरोना कालावधीमध्ये तालुक्‍यातील सर्वच प्रमुख अधिकारी तसेच कर्मचारी यांनी योग्य त्या उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पत्रकार संघाने याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला. आगामी काळात तालुका मराठी पत्रकार संघाला योग्य सहकार्य करण्यासाठी नेहमीच मदत राहील, अशी ग्वाही दिली

कार्यक्रमास पंचायत समितीच्या उपसभापती नीलम पवार, नगरपंचायत नगराध्यक्ष पंडित दळवी, उपनगराध्यक्ष आयाज मुल्ला, गटनेते चंद्रशेखर सगरे, वैभव गुरव, सुनील माळी प्रा. दादासाहेब ढेरे, संजय कोळी, अशोक पाटील, ॲड. शेखरराजे निंबाळकर, अविराजे शिंदे, अल्लाबक्ष मुल्ला, शितल परदेशी, सरपंच सुहास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

स्वागत गोरख चव्हाण तर प्रास्ताविक संताजी भोसले यांनी केले. संघाचे अध्यक्ष संजय बनसोडे, लखन घोरपडे, महेश देसाई, अभिषेक साळुंखे, भारत देसाई, दीपक सूर्यवंशी, गुलाबराव भोसले, दिलीप जाधव, काकासाहेब आठवले, रघुनाथ भोसले, हिरालाल तांबोळी, शम्मु मुल्ला, चंद्रकांत खरात,तानाजी शिंगाडे, विजय कांबळेसह पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments