Daily Mahasatta

Daily Mahasatta

आळसंद ग्रामपंचातीच्या कामकाजात अडथळा अाणणांर्‍याविरुध्द कारवाई करा : सरपंच इंदुमती जाधव

विटा (प्रतिनिधी)
आळसंद ग्रामपंचातीच्या कामकाजात अडथळा अाणणांर्‍याविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच इंदुमती जाधव यांनी केली आहे. याबाबत सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हंटले आहे, आळसंद (ता. खानापूर) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 2 कोटी 17 लाख रुपयांची योजना पुर्ण करण्यात आली असून ती योजना 19 फेब्रुवारी 2020 रोजी कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेद्वारा शुध्द पाण्याचा गावाला पुरवठा होत आहे. मात्र गावातील काही विरोधक जाणूनबुजून लोकांमध्ये गैरसमज पसरविण्यासाठी ग्रामपंचायतची पाणीपट्टी भरु नका असे लाऊडस्पिकरद्वारे आवाहन करित आहेत. तरी यामुळे कर वसुलीस अडथळा येत असून अशा प्रकारे शासकीय कामात मुद्दामहून अडचण निर्माण करणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी.

काही व्यक्ती राजकीय द्वेषाने प्रेरीत होऊन ग्रामस्थांना पिण्याचे पाणी वेळवर उपलब्ध होऊ नये, याकरता वेगवेगळे समाजकंटक उभे करून अडथळे निर्माण करीत आहेत व पाणी अशुद्धतेची खोटी माहिती लाऊडस्पीकरद्वारे गावांमध्ये पसरून व ग्रामस्थांना भयभीत करून जीवनावश्यक बाबींमध्ये वेठीस धरीत आहेत तसेच ग्रामस्थांना ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी कर न भरण्याचे आवाहन करुन ग्रामपंचायतीस नियमबाह्यपणे वेठीस धरीत आहेत.याच्या ध्वनीफित तयार करण्यात आलेल्या असून त्यामुळे कर वसुलीवरती न झाल्याने सदर योजनेवर येणारा देखभाल, दुरुस्ती खर्च उपलब्ध होत नसल्या कारणाने योजना चालवणे व कर्मचारी पगार, वीजबील आणि दुरुस्ती आदी खर्च भागवणे ग्रामपंचायतीस प्रचंड अडचणीचे ठरत आहे.

तरी वरील सर्व बाबींचा विचार होऊन संबंधितांवरती योग्य ती कार्यवाही व्हावी अन्यथा आम्ही दि.1/02/2021 पासून ग्रामपंचायतसमोर खुल्या हॉलमध्ये धरणे आंदोलन तसेच लाक्षणिक उपोषण करण्यात येईल तसेच सदर पाणी पुरवठा योजनेत काही दोष असल्यास पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद व ठेकेदार यांना दोष दूर करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी सरपंच जाधव, ग्रामसेवक, ग्रा.पं.सदस्य व आजी माजी पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments