कडेगाव (सचिन मोहिते)
युवा नेते डॉ. जितेश कदम यांची भारती सहकारी
बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर कृषी राज्य मंत्री डाॅ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डाॅ जितेश कदम म्हणाले, सहकार क्षेत्रात बहुजन समाजाला व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला आर्थिक आधार देऊन उभं करता येईल व त्यातून दुबळ्या घटकातील लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करता येईल, या भावनेतून माजी मंत्री स्व. डॉ. पतंगरावजी कदम साहेबांनी अतिशय परिश्रमपूर्वक भारती सहकारी बँकेची स्थापना केली. आज भारती सह. बँक ५० व्या वर्षात पदार्पण करीत असताना मला सार्थ अभिमान वाटतो की, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असताना मला मिळालेल्या अनुभवातून मंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या अनुमतीने व बँकेच्या निवडणूक प्रक्रियेतून माझी भारती सह. बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या संधीच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून विश्वास, शिस्त आणि पारदर्शक कारभारामुळे नावलौकिक मिळवलेल्या भारती सह. बँकेला अग्रस्थानी राहण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहील, असे मत जितेश कदम यांनी व्यक्त केले.

0 Comments