Daily Mahasatta

Daily Mahasatta

'कोहिनूर-ए-गझल' इलाही जमादार यांचे निधन

सांगली ( महासत्ता वेब टीम )
मराठी कवितेच्या क्षेत्रात आपल्या लेखणीने स्वतः चे अढळ स्थान निर्माण केलेल्या 'कोहिनूर-ए-गझल' इलाही जमादार यांचे आज निधन झाले. इलाही जमादार यांचे वृद्धापकाळानं निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. सांगलीतील मुळ गावी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत.

" जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला,
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा..!" सारख्या अनेक गझल त्यांनी लिहल्या. त्यांची एकतरी गझल प्रत्येक कवी संमेलनात सादर केली जायचीच. जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी सांगलीतील दुधगाव येथे झाला होता. मात्र, ते पुण्यात वास्तव्यास होते. १९७०च्या आसपास सुरेश भटांनी उर्दू गझलेला मराठीत अढळ स्थान प्राप्त करुन दिल्यानंतर मराठी गझल विश्वात इलाही जमादार यांचे नाव घेतले जाते. इलाही जमादार यांच्या गझला या महाराष्ट्रासोबतच देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रमाचे कार्यक्रमांनाही प्रेक्षकांची अलोट गर्दी असायची. त्याचबरोबर, अकाशवाणी, दुरदर्शनसोबतही त्यांनी काम केलं आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी तोल जाऊन पडल्यामुळं त्यांच्या डोक्याला मार लागला होता. तसंच, त्यांना स्मृतीभ्रंशाचा आजारही जडला होता. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचारही सुरु होते

अगतिक झालो अपंग झालो
कुबेर असुनी भणंग झालो

पंख दिले अन दिले गगन तू
तुझ्यामुळे मी विहंग झालो

मृगजळ सागर सभोवताली
मीही फसवा तरंग झालो

गगन धरेचे नाते तुटले
भरकटणारा पतंग झालो

स्वतः केवडा असतानाही
विळख्याने मी भुजंग झालो

भक्ती रसाने चिंब 'इलाही'
दंग जाहलो अभंग झालो

'इलाही जमादार'

Post a Comment

0 Comments