Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

मसुचीवाडी ग्रामपंचायतीत बिनविरोधचा डाव फसला; राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रयत्न फेल

वाळवा (रहिम पठाण)
मसुचीवाडी ता. वाळवा ग्रामपंचायत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी, यासाठी खूप प्रयत्न झाले. पण शेवटच्या टप्यात हे प्रयत्न फेल ठरले. मात्र एकूण 4 वाॕर्ड व 11 जागांपैकी 9 जागा बिनविरोध करण्यात यश आले आहे.

वाॕर्ड नंबर 4 मध्ये ओपन पुरुष व आ. जा. महिला या जागांसाठी निवडणूक लागली आहे. विशेष म्हणजे यावेळी बिनविरोध साठी वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरीष्ठ मंडळीनी लक्ष घातले. पण त्याला गावातील पक्षातीलच उमेदवारांनी खो घातला त्यामुळे निवडणूकीत वेगळीच नामुष्की आली की काय, यावरती चर्चा सुरु आहे.

या निवडणूकीत हुतात्मा गटाने बाहेरुनच लक्ष ठेवणे पसंत केले होते. हुतात्मा गटाचे प्रमुख पडद्यामागुनच डाव टाकत होते व आपणाला अपेक्षित गोष्टी घडवत होते. राजकारणात सावध पावले टाकत हुतात्मा गटाला यश आलेले दिसते आहे. मात्र राष्ट्रवादीने जोमाने प्रयत्न करुन ही मसुचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकली नाही. यावेळी युध्द जिंकले पण तहात मात्र हार पत्कारावी लागली, अशा पध्दतीची चर्चा रंगु लागली आहे.

Post a comment

0 Comments