Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विट्यातील सुमीत सिद्धेश्वर कोरे यास पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक

विटा (प्रतिनिधी)
बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल आणि जीवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी विटा येथील सुमीत सिद्धेश्वर कोरे (उभी पेठ, नाथ गल्ली ) आणि सौरभ कांबळे रा. अंबक फाटा ता. कडेगाव या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपीनी कडेगाव येथे ज्वेलरी फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघडकीस आले आहे.

गुन्हयाची थोडक्यात हकीकत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली कडील अधिकारी व कर्मचारी कडेगाव पोलीस ठाणे विभागत रेकॉर्डवरील आरोपी चेंक करीत पेट्रोलिंग करीत असताना संतोष गळवे, अनिल कोळेकर यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुमीत कोरे रा. विटा व सौरभ कांबळे रा. अंबक फाटा हे आपल्याजवळ बेकायदा गावठी शस्त्र बाळगुन कडेगांव एमआयडीसी परिसरात येणार असुन त्यातील सुमीत कोरे याने अंगात लाल
रंगाचा टि शर्ट घातला आहे, अशी विश्वसनिय बातमी मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गन्हे अन्वेषण शाखासांगली कडील अधिकारी व कर्मचारी यांनी कडेगांव एमआयडीसी परिसरात सापळा लावुन थांबलेअसता, दोन इसम कडेगांव एमआयडीसी मध्ये रस्त्याचे डावे बाजुस थांबलेले दिसुन आले. या पैकी एकाने लाल रंगाचा शर्ट घातलेला दिसला. बातमीप्रमाणे त्यांचा संशय येवुन खात्री झाल्याने त्यांना सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी ताब्यात घेऊन त्याचे नाव व गाव विचारता लाल टि शर्ट घातलेल्या इसमानेआपले नाव सुमीत सिद्धेश्वर कोरे ( वय. २३ वर्षे रा. उभी पेठ नाथ गल्ली विटा ता. खानापुर जि. सांगली व दुसरा इसम सौरभ मुकेश कांबळे वय. २० वर्षे मुळ रा. बहादुरवाडी, ता. वाळवा जि. सांगली सध्या, रा. अंबक फाटा ता. कडेगांव जि. सांगली असे सांगीतले.

त्यावेळी सुमीत कोरे झडती घेतली असता त्याचे कमरेस डावे बाजुस खोचलेले एक काळे रंगाचे धातुचे अग्निशस्त्र मिळुन आले व त्याचे पॅन्टचे उजवे खिशात रोख रक्कम मिळुन आली. व सौरभ कांबळे याचे अंगझडतीत पॅन्टचे डावे खिशात दोन जिवंत काडतुसे व रोख रक्कम मिळुन आले. तो मुदेमाल सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन ताबेतघेतला, व त्याचेकडे आणखी विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने कडेगांव पोलीस ठाणे हद्दीतील
ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केल्या असल्याचे सागितले.

त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी कडेगाव पोलीस ठाणे येथे खात्री केली असता कडेगांव पोलीस ठाण्यात गुरनं १५/२०२१ भादंविस  कलम ४५७, ३८०, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबत समजले. त्यावेळी त्याना पुढील तपासकामी आर्म अॅक्ट व ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केला या गुन्हयाचे तपासकामी वर्ग करणेत आले आहे.


Post a Comment

0 Comments