Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

डॉ. बी. एस. भोसले यांना 'द इयर इन ट्रींटीग कॅन्सर' पुरस्कार

: कॅन्सर क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिला जातो हा पुरस्कार

सांगली / प्रतिनिधी
येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ. बी एस भोसले यांना 2020 या सालाचा 'इंडिया'ज बेस्ट होमिओपॅथी कन्सल्टंट ऑफ द इयर इन ट्रीटिंग कॅसर' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथील रिसर्च फाउंडेशनच्यावतीने प्रत्येक वर्षी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नामवंत धन्वंतरीना हा पुरस्कार दिला जातो. 2020 सालीच्या पुरस्कारासाठी मिरज येथील आशा होमिओपॅथीक क्लिनिकचे संचालक तथा होमिओपॅथी तज्ञ डॉ. बी. एस. भोसले
यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे पार पडलेल्या पुरस्कार प्रदान समारंभात प्रसिद्ध सिनेअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्याहस्ते डॉ. बी. एस. भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धती म्हणून होमिओपॅथी उपचार पद्धतीकडे
पाहिले जाते आणि होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या माध्यमातून गेली १८ वर्षाहून अधिक काळ सर्व प्रकारच्या कॅसरसह रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, मतिमंद, नैराश्य, उंची वाढवणे, अशा सर्व असाध्य आजारावर उपचार करीत असून आतापर्यंत त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. तसेच कोरोना महामारीत सुद्धा डॉ. भोसले यांनी अत्यंत प्रभावीपणे रुग्णांची सेवा करून कोरोनाचा प्रसार रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबई येथे पार पडलेल्या पुरस्कार प्रदान समारंभात प्रसिद्ध सिनेअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्याहस्ते डॉ. बी. एस. भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Post a comment

0 Comments