Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

आमदार बाबर यांच्या प्रयत्नातून खानापूर नगरपंचायतीसाठी तीन कोटीचा निधी मंजूर : सुहास शिंदे

विटा (मनोज देवकर )
खानापूर नगरपंचायतीच्या विकासासाठी आ. अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांनी दिली.

आमदार बाबर यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खानापूर नगर पंचायतीसाठी प्रथमच एवढा निधी मंजूर झाला आहे. आम्ही खानापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांनी सांगितले.

खानापूर नगर पंचायत इमारत बांधण्यासाठी साठी दोन कोटी मंजूर झाले आहेत. मुस्लिम समाज दफनभूमी साठी पंचवीस लाख , कुंभार समाज , तेली समाज आणि माळी समाजाच्या स्मशानभूमीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकी पंचवीस लाख असे एकूण तीन कोटी मंजूर झाले आहेत, अशी माहिती सुहास शिंदे यांनी दिली.

Post a comment

0 Comments