Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

संजय विभुते यांचे आरोप वैभव पाटील यांनी फेटाळले

विटा ( मनोज देवकर )
संजय बापू, माहिती घेतल्याशिवाय बोलू नका. कराड विजापूर हायवे चे काम चालू आहे. त्याच्या निकषांमध्ये कुठेही अतिक्रमण हटवणे, पूर्वापार उभं असलेले बांधकाम हटवणे , जागा ताब्यात घेणे यासंदर्भात उल्लेख नाही. फक्त शंभर फुटच काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे बगलबच्च्यांचे अतिक्रमण हटू नये म्हणून रस्ता रुंदीकरण करू देत नाही या आरोपात तथ्य नसल्याचे प्रतिपादन वैभव पाटील यांनी केले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी विटा नगरपालिकेच्या कारभारावर टिका केली होती. आज झालेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी वैभव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

यावेळी बोलताना पाटील यांनी स्पष्टीकरण दिले ते असे,
" चिरवळ ओढा ते क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापर्यंत चा रस्ता नगरपालिकेच्या अखत्यारीत येतो. तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंतचा भाग हा गावठाण मध्ये आणि दाटीवाटीचा आहे. या परिसरात जुनी पाण्याची टाकी, क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक , छत्रपती शिवाजी महाराज स्मारक , बाबासाहेब आंबेडकर स्मारक ही ऐतिहासिक स्मारके येतात. त्यांना कोणत्याही परिस्थितीत धक्का लावता येणार नाही. सामाजिक भावनांचा ही विचार करावा लागतो असे वैभ। पाटील म्हणाले.

जर कुणाचे अतिक्रमण असेल तर संजय बापूंनी पुराव्यासह लक्षात आणून द्यावे. सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावून ते हटवू असा टोला पाटील यांनी विभूते यांना लगावला. विटा शहरासाठी बारा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यात अडीच कोटी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण साठी मंजूर आहेत. ते रस्ते दाट लोकवस्तीतील आहेत. तिथे भुयारी गटाराचे काम आहे. नळपाणी जोडण्या आहेत. कुणाचा यात स्वार्थ आहे का? कुणाचा क्रश सँड चा प्लॅन्ट आहे का ? त्यांच्यासाठी म्हणून काँक्रीटीकरण चे रस्ते धरले जातायत का ? असे शालजोडीतले टोमणे वैभव पाटील यांनी मारले. हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया माझ्या सारख्या सामान्य नगरसेवकाचे ऐकत असेल का ? फक्त एक किलोमीटर चे काम करता येणार नाही म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती असेही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments