Daily Mahasatta

Daily Mahasatta

खानापूर तालुक्यात सरपंचपदासाठीचे आरक्षण जाहीर

विटा ( मनोज देवकर )
खानापूर तालुक्यातील ६४ गावांच्या ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत आज तहसीलदार कार्यालयात पार पडली. प्रांताधिकारी संतोष भोर , तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया शांततेत पार पडली. २०११ च्या जनगणने नुसार आणि १९९५ पासूनची आधी पडलेली आरक्षणे पाहून या सोडता काढण्यात आल्या. आवश्यक तिथे उदय पवार या सहा वर्षाच्या मुलांकडून चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली.

तालुक्यातील नऊ गावातील सरपंचपद अनुसुचित जाती साठी राखीव असून त्यापैकी महिला साठी आरक्षित गावे पुढीलप्रमाणे भाग्यनगर, चिंचणी मं, घोटी खुर्द , हिवरे , रामनगर .

अनुसूचित जाती सर्वसाधारण पोसेवाडी , भाळवणी , सांगोले , मेंगाणवाडी

नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC महिला हे आरक्षण पडलेली गावे पुढीलप्रमाणे , बलवडी भा , भिकवडी बु. धोंडगेवाडी ,मंगरूळ , रेणावी , जाधववाडी , धोंडगेवाडी, वेजेगाव .

नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण :

बलवडी खा , पळशी , तांदळगाव , जोंधळखिंडी , वलखड , बेनापूर ,चिखलहोळ , वासुंबे . ढवळेश्वर

सर्वसाधारण ( खुले) महिला
बानूरगड , राजधानी भेंडवडे , वाझर , गार्डी , पारे , ताडाचीवाडी , भांबर्डे , शेंडगेवाडी , कलंबी , घोटी बु. , खांबाळे भा , कुर्ली , सुलतानगादे , मादळमुठी, साळशिंगे ,लेंगरे , हिंगणगादे , मोही , देवीखिंडी या ग्रामपंचायती मध्ये सर्वसाधारण महिला सरपंच होणार आहेत.

उरलेली सर्वसाधारण साठी सरपंचपद खुले असलेली गावे पुढीलप्रमाणे
करंजे , भूड , गोरेवाडी , घानवड, कमळापूर , पंचलिंग नगर , रेवनगाव , भेंडवडे ( गावठाण ) माहुली , भडकेवाडी , देवनगर , नागेवाडी , जखिनवाडी , वाळूज , आळसंद , ऐनवाडी, कार्वे , बामणी , जाधवनगर

Post a Comment

0 Comments