Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वनश्री दूध डेअरी व मुस्लिम जमातच्यावतीने पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

इस्लामपूर (प्रतिनिधी)
पेठ ता. वाळवा येथे पत्रकार दिनानिमित्त वनश्री दूध डेअरी, पेठ व मुस्लिम जमात, पेठ यांच्यावतीने पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांचा सन्मान करण्यात आला. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार सामाजिक, राजकीय व शैक्षणिक बाबी समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात, असे मत जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांनी व्यक्त केले.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून पेठ येथील पत्रकार विनायक नायकल, अशोक माळी, विकास पेठकर, सूर्यकांत शिंदे, तसेच वृत्तपत्र विक्रेते फारुख ढगे, हणमंत जाधव, बालम जमादार तसेच यावर्षीचा वाळवा तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल रियाज मुल्ला आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी माजी उपसरपंच अमीर ढगे गोरख मदने, राहुल पाटील, विकास दाभोळे, काका माळवदे, विशाल शेटे, व्यंकटराव कदम, भगवान कदम, कैलास माळी, आकाराम नायकल, बजरंग भोसले आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णात पाटील यांनी तर आभार शंकर पाटील यांनी मानले.

पेठ येथील मुस्लिम जमात पेठ यांच्यावतीने वाळवा तालुका श्रमिक संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल पेठ चे दैनिक महासत्ता चे पत्रकार रियाज मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुस्लिम जमात चे चेअरमन जवाहर ढगे, व्हा. चेअरमन इसाक संदे, फिरोज ढगे, रमजान मुल्ला, आयुब जमादार, आसिफ जकाते , अरिफ जमादर, इरफान ढगे, वजीर संदे, रिजवान जमादार, नौशाद मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments