Daily Mahasatta

Daily Mahasatta

मसुचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. राधिका पाटोळे निश्चित

वाळवा (रहिम पठाण)
नुकत्याच झालेले ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये मसुचीवाडी गावात मा. दत्तू आप्पा व सर्जेराव बापू गटाची सत्ता आली आहे. एकूण 11 जागावरती त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. काल इस्लामपूर येथे सरपंच पदाची सोडत निघाली त्यामध्ये मसुचीवाडी गावातील सरपंच पद अनुसुचित जाती माहीला यासाठी आरक्षीत पडले आहे. या आरक्षणातून एकमेव सौ राधिका पाटोळे या निवडूण आल्यामुळे त्यांची निवड सरपंच पदी निश्चित आहे.

आता यावेळी उप सरपंच पदी कोणाला संधी मिळते बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण यावेळची निवडणूक संपूर्ण युवा वर्गाने हाती घेतली होती.
वाॕर्ड नंबर 4 मधून प्रत्यक्ष मतदारातून एक नव युवक निवडून आलेला आहे. त्यांना संधी मिळते का आणि कोण या पदावरती विराजमाण होतय हे येणारा काळच ठरवेल. कारण दोन्ही गटाना अडीच अडीच वर्षे सत्तेचा वाटा मिळणार आहे. एकूणच येणार्या पाच वर्षात गावाचा विकास व्हावा हीच मतदारांची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments