Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कुपवाड मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम; सहायक आयुक्त व खोकी मालकात बाचाबाची

कुपवाड (प्रमोद अथणिकर)
सांगली मनपाच्यावतीने कुपवाड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी सात ते आठ खोकी हटवण्यात आली. याप्रसंगी सहायक आयुक्त  व खोकी मालकात किरकोळ बाचाबाचीचा प्रकार घडला.

आज दुपारी एकच्या सुमराज अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी संत रोहिदास कमानी जवळील ठेवण्यात आलेली सात ते आठ खोकी हटवण्यात आले. यादरम्यान सहायक आयुक्त व खोकी मालक याच्या मध्ये शाब्दिक बाचाबाची ही झाली. अतिक्रमण हटविताना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी सहा आयुक्त दत्तात्रेय गायकवाड व मनपा अधिकारी,कर्मचारी व पोलीस हजर होते.

Post a comment

0 Comments