Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

चंद्रकांत मिठारी यांना जीवनगौरव पुरस्कार, मंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्याहस्ते सन्मान

सांगली (प्रतिनिधी)
दैनिक महासत्ताच्या माध्यमातून सुमारे ३५ वर्षाहून अधिक काळ वृत्तपत्र सृष्टीत मोलाचे योगदान देणार्या चंद्रकांत मिठारी यांना कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोर्टर्स असोसिएशन, कोल्हापूर यांच्यावतीने मानाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्याहस्ते रविवार १० जानेवारी रोजी हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोर्टर्स असोसिएशन, कोल्हापूर यांच्यावतीने प्रसिद्धी माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींचा पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षी देखील रविवार ता. १० जानेवारी रोजी संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे येथे हा समारंभ संपन्न होत आहे. यावेळी दैनिक महासत्ताचे व्यवस्थापक मा. चंद्रकांत मिठारी यांना या समारंभात ' जीवन गौरव ' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी दिली आहे.

पत्रकार दिनानिमित्त होणार्या या समारंभास संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त मा. विनायक भोसले, प्राचार्य मा. विराट गिरी, जेष्ठ पत्रकार समीर देशपांडे, कार्यकारी संपादक ताज मुलाणी यांच्यासह कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्हयातील पत्रकार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. 

Post a comment

0 Comments