Daily Mahasatta

Daily Mahasatta

भारती डेंटल कॉलेज मध्ये कोविड योद्ध्यांचा सन्मान

सांगली - येथे प्राचार्या डॉ. विद्या दोडवाड यांच्यासोबत कोविड योद्धे.

सांगली / प्रतिनिधी
येथील भारती विद्यापीठ डेंटल कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी कोरोनाचे आव्हान समोर असताना भारती हॉस्पिटल येथे दिवसरात्र रूग्णांची सेवा केली. त्याबद्दल प्राचार्या डॉ. विद्या दोडवाड यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी सर्वांचे कौतुक केले. कोविड योद्धा म्हणून काम करण्याची तयारी दर्शवलेल्या सर्व कोविड योद्ध्यांना सलाम करताना प्राचार्या डॉ. विद्या दोडवाड यांनी आभार व्यक्त केले. ही एकप्रकारे देशसेवा असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रगीत म्हणून सर्वांनी हा प्रसंग साजरा केला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या सांगलीचे जिल्हा समन्वयक डॉ. समृद्धी मेथा यांनी सर्वांचे कौतुक केले व कृतज्ञता व्यक्त केली.

संयोजन डॉ. स्वप्निल मेथा यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments