Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

विटा पालिकेच्या बांधकाम सभापती पदी अरुण विष्णू गायकवाड

विटा ( मनोज देवकर )
विटा नगरपरिषदेच्या विविध सभापती निवडी आज बिनविरोध पार पडल्या. सार्वजनिक बांधकाम सभापती पदी अरुण विष्णू गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी संतोष भोर यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी अतुल पाटील प्रमुख उपस्थित होते.

शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यसमितीच्या सभापती पदी संजय हरिश्चंद्र तारळेकर , स्वच्छता , वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीवर दहावीर रावसो शितोळे , पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समितीवर मालती विश्वनाथ कांबळे यांची वर्णी लागली आहे.

महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती पदी सौ. प्रतिभा अविनाश चोथे तर सौ सानिका निलेश दिवटे यांची उपसभापती निवड झाली आहे. स्थायी समिती च्या सदस्य पदी युवानेते वैभव सदाशिवराव पाटील , किरण मारुती तारळेकर , सौ सारिका संजय सपकाळ यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. नूतन पदाधिकाऱ्यांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला.

Post a comment

0 Comments