Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

क्षितिजा पवार शिवाजी विद्यापिठात प्रथम

कडेगाव (सचिन मोहिते)
कुमारी क्षितिजा परशुराम पवार हिने कला शाखेत तिसऱ्या वर्षी इतिहास इतिहास विषयात सेमिस्टर ५ मध्ये ९१ टक्के व सेमिस्टर सहामध्ये ९९.३३ टक्के गुण मिळवून एकूण ९५ टक्के गुणासह शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. क्षितीजा ही भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

या यशाबद्धल नामदार डॉ. विश्वजीत कदम व श्रीमती विजयमाला ( वहिनीसाहेब ) कदम यांनी तिचे अभिनंदन केले आहे. क्षितिजा पवार हिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. सुलक्षणा कुलकर्णी तसेच प्राध्यापक आविनाश यादव, प्राध्यापक भिमराव साठे यासह इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे .

Post a comment

0 Comments