Daily Mahasatta

Daily Mahasatta

जत तालुक्यात ' दलित पँथर' किंग मेकर ठरणार; भूपेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाची चुणूक

जत (सोमनिंग कोळी)
जतच्या राजकारण आणि समाजकारणात काही वर्षात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे दलित पँथरचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांच्या
नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्य ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी दमदार साथ दिली आहे. तीसपैकी बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या विचारांचे सदस्य विजयी झाले आहेत. काँग्रेस सोबत आघाडी
करत या तरूण आणि आंबडेकरी चळवळीतील युवा नेत्याने आपल्या नेतृत्वाची चुणूक तालुकाभर दाखवून दिली आहे.

भुपेंद्र कांबळे यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करत उमेदवार उभे केले होते. यातील १५ गावात त्यांच्या विचारांचे सदस्य विजयी झाले. अनेक वर्षे जतच्या चळवळीला इतकी मोठी ताकद कधी लाभली नव्हती. परंतु भूपेंद्र यांच्या रूपांनी आंबेडकरी चळवळीला मोठे बळ मिळत आहे. आमदार विक्रमदादा सावंत यांचे विश्वासू नेते म्हणुन त्यांची ओळख आहे. वेगळ्या विचारधारेने काम करणारे हे नेतृत्व आहे. जत पालिकेत तीन वर्षापासून कार्यरत आहेत. आक्रमकपणे व जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारा नगरसेवक म्हणून अशी ओळख आहे.

तीन वर्षात त्यांच्या प्रभागात कोट्यवधीची विकासकामे मार्गी लावली आहेत. जतच्या वैभवात भर घालणारे नियोजित आंबेडकर उद्यान आणि डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे कामही त्यांनी हाती घेत त्यास गती दिली आहे. निकालानंतर भूपेंद्र कांबळे व
त्यांच्या टीमने प्रत्येक गावात जावून दलित पँथरच्या विजयी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला.

यावेळी भूपेंद्र कांबळे म्हणाले, आमदार विक्रम सावंत यांनी नेहमीच चांगल्य गोष्टींची पाठराखण केली आहे. माझ्यामागे ते नेहमीच उभे आहेत. या निवडणुकीत त्यांची चांगली साथ मिळाली. अनेक गावात काँग्रेस आणि पँथरच्या विचाराचे सदस्य विजयी झाले. येणार्या काळात आ. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे करण्यात पुढाकार घेवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments