Daily Mahasatta

Daily Mahasatta

कर्मवीर चौकात साकारणार ' आय लव सांगली ' चा सेल्फी पॉईंट

: नगरसेवक अभिजित भोसले आणि पॅपीलॉन फार्मासिटीकल स्व खर्चाने उभारणार सेल्फी पॉईंट
: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते उदघाटन

सांगली (प्रतिनिधी )
: सांगलीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आता सामाजिक संस्था संघटना पुढं येत आहेत. याच उद्देशाने नगरसेवक अभिजित भोसले आणि पॅपीलॉन फार्मा सिटीकल कर्मवीर चौकात स्व खर्चाने सेल्फी पॉईंट साकारत आहे. या कामाचा शुभारंभ मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते शनिवारी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आला. हा सेल्फी पॉईंट सांगलीच्या सुंदरतेत भर टाकणारा ठरणार आहे.

सांगलीच्या कर्मवीर चौकात आय लव सांगलीचा सेल्फी पॉईंट उभारला जाणार असून यासाठी येणारा खर्च कॉंग्रेस नगरसेवक अभिजित भोसले आणि पॅपीलॉन फार्मासिटीकल प्रायव्हेट लिमिटेड करणार आहे. कर्मवीर चौकातील हा सेल्फी पॉईंट सांगलीच्या सौन्दर्यात भर घालणारा ठरणार असून स्व खर्चाने उभारला जाणार आहे.

या कामाचा शुभारंभ मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अमर निंबाळकर, प्रकाश नवलाई, पॅपीलॉन फार्मासिटीकल प्रायव्हेट लिमिटेड सचिन चव्हाण, विशाल पवार, सूरज चव्हाण , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे मेजर आकाश तिवडे, कुलदीप देवकुळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments