Daily Mahasatta

Daily Mahasatta

खानापूर मतदारसंघ राष्ट्रवादीमय करणार : अॅड. सदाशिवराव पाटील

विटा (मनोज देवकर )
खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कल या मतदार संघातील सर्वच गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सक्षम करून येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या बहुमताने जिंकण्यासाठी सद्या मोर्चेबांधणी सुरू आहे. भविष्यात खानापूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास माजी आमदार अॅड. सदाशिव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षाच्या विचारांच्या सदस्यांना लोकांनी भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार आहे, असे प्रतिपादन नवनिवार्चीत पदाधिकारी निवडीवेळी सदाशिवराव पाटील यांनी केले

नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड ही राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश कार्यकारणी सदस्य मा आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा छाया पाटील, जिल्हा युवती अध्यक्षा पूजा लाड,जिल्हा विद्यार्थी सेल अध्यक्ष ज्ञानेश पाटील यांच्या  उपस्थितीत करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकारी सौ लताताई सुरेश मेटकरी (महिला विटा शहर अध्यक्ष), सुरेखा जनार्दन पवार व निता अनिल धर्माधिकारी यांना महिला जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी, श्री किरण अशोक मेटकरी यांना विद्यार्थी जिल्हा कार्यकारणी पदी, सचिन मेटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेस विटा शहर उपाध्यक्षपदी, अॅड कुबेर शेडबाळे यांना लिगल सेल च्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी, डॉ. दादासाहेब पाटील यांना खानापूर तालुका डॉक्टर सेलच्या अध्यक्ष पदी, सौ वैशाली मारुती दाभूगडे यांना खानापूर शहर महिला अध्यक्षपदी व सौ शोभा जयसिंग माने यांची खानापूर शहर महिला उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किसन जानकर,उपाध्यक्ष सचिन शिंदे खानापूर तालुका क्षेत्र अध्यक्ष हरी माने, ज्येष्ठ नेते विश्वनाथ कांबळे तसेच खानापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments