Daily Mahasatta

Daily Mahasatta

कडेगाव कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त विविध स्पर्धा

कडेगाव (सचिन मोहिते)
कडेगाव येथील भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत कनिष्ठ विभागाच्या वतीने निबंध , वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील बहुसंख्य विध्यार्थीनिनी सहभाग घेतला होता.

घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धा प्रकारात कु.ऋतुजा महाडिक इयत्ता११ वी विज्ञान वि हिने प्रथम, कु.संध्या माने हिने द्वितीय तर कु.साक्षी आडके हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच वक्तृत्व या स्पर्धा प्रकारात कु.साक्षी सूर्यवंशी ११ वाणिज्य हिने प्रथम, कु.सना मुजावर ११ वी विज्ञान हिने द्वितीय तर कु.साक्षी कल्याणकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

याच दिवशी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत कु.ऋतुजा महाडिक ११ वी विज्ञान हिने प्रथम , कु.नीलम पवार ११ कला हिने द्वितीय तर कु.ऋतुजा म्हस्के ११ वी विज्ञान हिने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धांचे संयोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले . सांकृतिक विभाग प्रमुख श्री नंदकुमार मोहिते व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अप्पासाहेब वेताळ यांनी संयोजन केले. यशस्वी सर्व विद्यार्थीनीचे दि २५ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय मतदारदिनी प्रांताधिकारी श्री गणेश मरकड , तहसीलदार सौ शैलजा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ सुलक्षणा कुलकर्णी यांनी यशस्वी विध्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments