Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

खानापूरात स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठीचा प्रस्ताव सादर करा : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई

विटा ( मनोज देवकर )
राज्याच्या ग्रामीण भागातील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाणे इमारत बांधकामांचे विविध प्रश्न व समस्या या टप्प्याटप्प्याने सोडविणार असल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मंत्रालयात ग्रामीण भागातील पोलीस निवासस्थाने व पोलीस स्टेशन इमारत बांधकामाच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली . बैठकीत आटपाडी जि. सांगली येथील पोलीस स्टेशन इमारतीच्या बांधकामाचे प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री देसाई यांनी दिले. खानापूर जि सांगली याठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन करणेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार अनिल बाबर, आमदार प्रकाश आबिटकर, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस जगन्नाथन आदी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील विशेषत: डोंगरी भागातील  पोलीस निवासस्थाने व पोलीस स्टेशन इमारतीसंदर्भात विविध प्रश्न आहेत. हे सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून ते टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येणार आहेत. आटपाडी येथील पोलीस स्टेशन इमारत आणि खानापूर मध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन होण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी पाठपुरावा केला होता.

Post a comment

0 Comments